विट्याच्या शिवप्रताप संस्थेला मोठे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:39 AM2021-02-26T04:39:30+5:302021-02-26T04:39:30+5:30
कराड : विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेच्या कऱ्हाड शाखेचे उद्घाटन गुरूवारी डॉ. अनिल शहा, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याहस्ते झाले. ...
कराड : विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेच्या कऱ्हाड शाखेचे उद्घाटन गुरूवारी डॉ. अनिल शहा, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रतापराव साळुंखे, विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कऱ्हाड शहर हे बॅँकिंग क्षेत्राला मोठे यश मिळवून देणारे आहे. या शहरात सर्वच संस्था चांगल्या प्रकारे चालतात. विटा येथील उद्योजक प्रतापराव साळुंखे यांनी सुरू केलेल्या शिवप्रताप मल्टिस्टेट पतसंस्थेमुळे कऱ्हाड तालुक्यातील लघु उद्योग व सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे शिवप्रताप संस्थेला आगामी काळात मोठे भवितव्य असल्याचे प्रतिपादन कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केले.
विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेच्या कऱ्हाड शाखेचे उद्घाटन गुरूवारी डॉ. अनिल शहा यांच्याहस्ते व नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, भाजपाचे पक्षप्रतोद विनायक पावसकर, रघुनाथकाका कदम, उपाध्यक्ष हणमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे उपस्थित होते.
अध्यक्ष प्रतापराव साळुंखे म्हणाले, शिवप्रताप पतसंस्था, साखर कारखाना, सूतगिरण्या, राजकारणी, पै-पाहुण्यांना कर्ज देत नाही. केवळ प्रामुख्याने सोने तारण किंवा उत्पादक गोष्टीलाच कर्ज जात आहे. त्यामुळे एनपीए शून्य टक्के करू शकलो. जनतेच्या पैशाचा विश्वस्त या नात्याने योग्य विनियोग करून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. कऱ्हाड शहरातही विश्वासपूर्वक वातावरण करून गरजूंना कर्ज पुरवठा केला जाईल.
कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी शिवप्रतापची उलाढाल २६० कोटींची असून १५० कोटींच्या ठेवी व १११ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेला १६ आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रवीण थोरात, किसनराव पाटील, डॉ. वसंतराव देवकर, सविता देवकर, डॉ. नितीन जाधव, डॉ. सतीश शिंदे, शामसुंदर तवटे, बाजीराव पाटील, प्रदीप शिंदे, स्वप्नील राऊत, जगदीश इंगवले, रमेश घाडगे, भूपेंद्र मेहता, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, स्वाती पिसाळ, संचालक सीताराम हारूगडे, आलम पटेल, सुरेखा जाधव, सरव्यवस्थापक धोंडीराम जाधव, सिकंदर शेख, सुजाता भिसे, शशिकांत कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.