कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 04:50 PM2022-08-25T16:50:53+5:302022-08-25T16:51:31+5:30

दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून येतात

Green arbitrator takes serious note of Krishna river pollution, orders report within two months | कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश

संग्रहित फोटो

googlenewsNext

सांगली : गेल्या महिन्यात कृष्णा नदीपात्रात लाखो मासे मृत झाले होते. याची गंभीर दखल घेत हरित लवादाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश बुधवारी दिले. न्यायाधीश दिनेशकुमार सिंग, शिवकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.

दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून येतात. साखर कारखान्याकडून घातक रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. काही उद्योजकांकडूनही घातक रसायने नदीपात्रात सोडली जातात. त्यातून लाखो मासे मरतात. यंदाही हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुनील फराटे व ॲड. ओंकार वांगीकर यांनी हरित न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

याचिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रतिवादी केले आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. हरित न्यायालयानेही या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.

याबाबत ॲड. वांगीकर म्हणाले, प्रदूषणाच्या कारणाचा अहवाल नोटीस मिळाल्यानंतर चार आठवड्यांत द्यावयाचा आहे. पुढील दोन महिन्यांत अहवाल अपेक्षित आहे. पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सातारा जिल्ह्यातील प्रदूषणाला साखर कारखाना जबाबदार आहे; तर सांगली जिल्ह्यात मात्र दूषित पाण्यामुळे मासे मेले असल्याचा अहवाल दिला आहे. याकडेही सुनावणीवेळी हरित न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. मुळात नदीत घातक रसायने सोडण्याचा वर्षानुवर्षे सुरू असलेला हा खेळ थांबला पाहिजे, यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच राहील.

Web Title: Green arbitrator takes serious note of Krishna river pollution, orders report within two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.