इस्लामपुरात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:20 AM2020-12-07T04:20:19+5:302020-12-07T04:20:19+5:30
इस्लामपूर : भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. मात्र देशातील जनता त्यांचा डाव हाणून पाडेल, असा विश्वास ...
इस्लामपूर : भारतीय राज्यघटनेची मोडतोड करण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. मात्र देशातील जनता त्यांचा डाव हाणून पाडेल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मंत्री पाटील यांनी इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी नवनिर्वाचित आ. जयंत आसगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक तालुकाध्य डॉ. संग्राम पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, आनंदराव मलगुंडे, विश्वनाथ डांगे, संगीता कांबळे, सुनीता सपकाळ, संग्राम पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी, ॲड. धैर्यशील पाटील, शैलेंद्र सूर्यवंशी, संचालक जालिंदर कांबळे, सागर चव्हाण आदींसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.