जिल्हा परिषदेत बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:25 AM2021-04-15T04:25:56+5:302021-04-15T04:25:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व कास्ट्राईब शिक्षक संघटनांतर्फे जिल्हा परिषदेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व कास्ट्राईब शिक्षक संघटनांतर्फे जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार, महासंघाचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, पुणे विभागीय कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब व्हनखंडे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजकल्याण अधिकारी संभाजी पोवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कष्टकरी बहुजन आणि दलित समाजावर होणारा अन्याय दूर केला. बाबासाहेबांच्या विचाराची धुरा घेऊन आपण समाजात जाऊन तेथील उणिवा दूर करणे अतिशय गरजेचे आहे.
यावेळी जीएसटी अधिकारी सुरेंद्र पेंडे, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक संतोष वीर, कृषी विभागाचे कक्ष अधिकारी गणेश फड, समाजकल्याण अधीक्षक सुजीत भांबुरे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बनसोडे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव बाबासाहेब माने, कोषाध्यक्ष विजयकुमार सोनावणे, विद्याधर रास्ते, कार्याध्यक्ष संदेश बोतालजी, उपाध्यक्ष शिवाजी जोशी, कृष्णा मासाळ, सचिन ढाले आदी उपस्थित होते.