सांगलीत मदनभाऊ पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:43+5:302020-12-05T05:04:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त कृष्णाकाठावरील स्मारकस्थळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी ...

Greetings to Madanbhau Patil in Sangli | सांगलीत मदनभाऊ पाटील यांना अभिवादन

सांगलीत मदनभाऊ पाटील यांना अभिवादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : माजी मंत्री मदनभाऊ पाटील यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त कृष्णाकाठावरील स्मारकस्थळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, शैलजाभाभी पाटील, डॉ. जितेश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विश्वासबापू पाटील, सौ. सुनीता कदम, डॉ. मोनिका कदम, शंकरबापू पाटील, अरविंद पाटील, मानसिंग बँकेचे अध्यक्ष जे. के. बापू जाधव, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. शिकंदर जमादार, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, विष्णुअण्णा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, नगरसेवक संजय मेंढे, संतोष पाटील, फिरोज पठाण, मनोज सरगर, अमर निंबाळकर, रोहिणी पाटील, मदिना बारूदवाले, अजित दोरकर, वसंतदादा दंत महाविद्यालयाचे सचिव भावेश शहा, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव आनंदराव पाटील, मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, रत्नाकर नांगरे, चिंटू पवार, कय्युम पटवेगार, सोहेल बलबंड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. माधवनगर रोडवरील मदनभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

चौकट

विविध कार्यक्रमांचे आयोजन

जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक संतोष पाटील यांनी ऑनलाईन इंटरनॅशनल ओपन चेस चॅंपियनशीप स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सांगलीवाडी येथील ल. पा. पाटील विद्यालय सांगलीवाडी येथे विद्यार्थी भोजन कक्ष उभारणीचा पायाभरणी समारंभ जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. अशोक राणावत यांच्यावतीने राज्य शासनाच्या सर्व शासकीय योजनांची माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. नगरसेवक अभिजित भोसले यांच्यावतीने मिरज येथील बेघर महिला अनाथाश्रम येथे साडी व गिझर वाटपाचा कार्यक्रम, तसेच त्यांच्या प्रभागातील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

फोटो ओळी :-

काँग्रेसचे नेते मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्मारकस्थळी पालकमंत्री जयंत पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Greetings to Madanbhau Patil in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.