वाळवा येथे नागनाथअण्णा यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:47+5:302021-03-23T04:27:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९ व्या स्मृतिदिनी हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ९ व्या स्मृतिदिनी हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या स्मृती स्थळास अभिवादन करण्यात आले. हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी, संत तुकारामांचे वंशज चंद्रकांत मोरे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, स्नेहल गौरव नायकवडी, उपाध्यक्ष भगवान पाटील, कार्यकारी संचालक संजय गव्हाणे, साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर, कार्यवाह नंदिनी वैभव नायकवडी यांनीही अभिवादन केले.
क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्या व प्राचार्या डाॅ. सुषमा नायकवडी, प्रा. हाशिम वलांडकर, प्रा. राजा माळगी, संभाजीराव थोरात यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले. हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, सुरेश खणदळे यांनी अभिवादन केले. जिजामाता विद्यालयात मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके, सागर चिखलेंसह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिवादन केले.
वाळवा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर, सदस्य उमेश कानडे, बाळू आचरे, डाॅ. अशोक माळी, प्रमोद यादव, उमेश सावंत, रमेश जाधव यांनी प्रतिमापूजन करून अभिवादन केले.