पद्मप्रभ्‌ पतसंस्थेला ८२ लाख ढोबळ नफा : कुमार वाडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:18+5:302021-05-04T04:11:18+5:30

आष्टा : येथील श्री पद्मप्रभ्‌ नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर ८२ लाख इतका ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती ...

Gross profit of Padma Prabh Patsanstha 82 lakh: Kumar Wadkar | पद्मप्रभ्‌ पतसंस्थेला ८२ लाख ढोबळ नफा : कुमार वाडकर

पद्मप्रभ्‌ पतसंस्थेला ८२ लाख ढोबळ नफा : कुमार वाडकर

Next

आष्टा : येथील श्री पद्मप्रभ्‌ नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्चअखेर ८२ लाख इतका ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार वाडकर व उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.

कुमार वाडकर म्हणाले, आष्टा सहकारपंढरीत श्री पद्मप्रभ्‌ नागरी सहकारी पतसंस्थेने सभासद व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. महापूर, कोरोना संकट सुरू असतानाही ३१ मार्चअखेर संस्थेची ९८.८० टक्के कर्जवसुली झाली आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी २२ लाख, ठेवी २५ कोटी ८५ लाख, कर्ज वाटप १९ कोटी ६१ लाख, गुंतवणूक ९ कोटी ५३ लाख आहे.

संस्थेचे सचिव सुनील कोरे म्हणाले, सभासद ग्राहकांच्या मागणीवरून सांगली, आष्टा, गांधीनगर, वसगडे या ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू आहेत. शाखा सांगली येथे ४ कोटी ५ लाख ठेवी, कर्ज वाटप २ कोटी ५२ लाख, गुंतवणूक १ कोटी ६३ लाख, आष्टा गांधीनगर शाखेत ठेवी २ कोटी २ लाख, कर्ज वाटप १ कोटी ३५ लाख आहे.

अध्यक्ष कुमार वाडकर, उपाध्यक्ष अशोक पाटील, अनिल महाजन, दादासाहेब लोंढे, अशोक वाडकर, सर्जेराव माने, राजकुमार थोटे व सर्व संचालक, सभासद ग्राहक यांच्या सहकार्यामुळे संस्थेने प्रगती साधली आहे, अशी माहिती सुनील कोरे यांनी दिली.

Web Title: Gross profit of Padma Prabh Patsanstha 82 lakh: Kumar Wadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.