जिल्ह्यातील ९२ गावांत भूजल पातळी खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:00+5:302021-07-14T04:32:00+5:30
जत येथे भूजल जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे स्वागत केले, यावेळी प्रशांत हर्षद, संदीप मोरे, प्रमोद महाजन, विवेक नवाळे आदी उपस्थित होते. ...
जत येथे भूजल जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे स्वागत केले, यावेळी प्रशांत हर्षद, संदीप मोरे, प्रमोद महाजन, विवेक नवाळे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : अटल भूजल योजनेअंतर्गत जनजागृतीसाठीच्या चित्ररथाचे येथे स्वागत करण्यात आले. यावेळी पंचायत समितीतील अधीक्षक प्रशांत हर्षद, मंडलाधिकारी संदीप मोरे, प्रमोद महाजन, विवेक नवाळे, विठ्ठल पाटील, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आदिनाथ फाकटकर, विकास पाटील, मुकुंद पाटील आदी उपस्थित होते.
फाकटकर यांनी सांगितले की, अटल भूजल योजना तेरा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या तालुक्यांतील ९२ गावांची भूजल पातळी खालावत आहे, त्यामध्ये जत तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे. त्यादृष्टीने जनजागृती केली जात आहे. पुढील टप्प्यात लोकसहभागातून भूजल साठ्यात शाश्वतता निर्माण करणे, भूजल पुनर्भरण कार्यक्रम राबविणे आदी उपक्रम राबवले जातील.