गटनेत्यांनी फेटाळला निष्क्रियतेचा आरोप
By admin | Published: December 4, 2014 11:24 PM2014-12-04T23:24:12+5:302014-12-04T23:38:31+5:30
महापालिका : मोदी लाटेमुळे पराभव झाल्याचे मत
सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पराभवाला मोदी लाटेसह तत्कालीन वातावरण कारणीभूत होते. त्याला महापालिकेचा कारभार जबाबदार नाही, असे स्पष्टोक्ती गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर होणारा निष्क्रियतेचा आरोपही फेटाळून लावला.
गेल्या चार दिवसांपासून पालिकेच्या कारभारावर काँग्रेसमधून टीका होत होती. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शहरातील गॅस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर पालिका बरखास्तीची मागणी केली, तर माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करीत पालिकेच्या कारभारामुळेच मदन पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची टीका केली होती. याबाबत आज जामदार यांना विचारता ते म्हणाले की, गॅस्ट्रोबाबत पालिकेचे प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन मुकाबला केला आहे. दिवस-रात्र परिश्रम घेऊन ही साथ आटोक्यात आणली. महापालिका बरखास्त करून गॅस्ट्रोचा प्रश्न सुटणार नाही, असा टोलाही लगाविला. पतंगराव कदम हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नाराजी वृत्तपत्रातूनच कळली. लवकरच त्यांची भेट घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेतील पराभवाबाबत ते म्हणाले की, मदन पाटील यांच्या पराभवाला पालिकेचा कारभार जबाबदार नाही. तसे पाहिले तर माझ्या हातात
नायकवडी माझे सहकारी
माजी महापौर इद्रिस नायकवडी हे माझे सहकारी आहेत. दररोज त्यांची भेट होत असते. पण त्यांच्या अडचणी, प्रश्नांची आपल्याकडे माहिती नाही. कामकाजाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन
वेगवेगळा असतो, असे सांगत नायकवडींवर थेट टीका करण्याचे टाळले.
नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या पतंगराव यांच्या विनंतीवरुन आम्ही माघार घेतली आहे. कारभार सुधारला नाही तर आम्ही पुन्हा संघर्ष समिती करू. कारभारच नाही. महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतींच्या हाती कारभार असतो. गटनेते म्हणून केवळ आपण नेत्यांच्या आदेशाचे पालन होते की नाही, हे पहात असतो.
विधानसभेवेळचे वातावरण व मोदी लाट यामुळेच काँग्रेसला सांगलीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)