जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांत वाढ--वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 10:21 PM2017-10-06T22:21:27+5:302017-10-06T22:24:25+5:30

कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ

 Growth of the wildlife in the district - The effect of forest law and measures | जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांत वाढ--वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राण्यांत वाढ--वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

Next
ठळक मुद्दे नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावीप्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले

महालिंग सलगर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे पंधरा टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. या वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांबरोबरच तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ झाली आहे. रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या तर सततच वाढू लागली आहे.

जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील हरित वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वन विभागाच्या अखत्यारित जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वनक्षेत्रात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात.

जिल्ह्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत चांगली वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांबरोबर तृणभक्षी प्राण्यांचीही वाढ चांगल्या प्रमाणात होऊ लागली आहे.

जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये खानापूर-विटा या तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. प्रगणनेवेळी मागीलवर्षी सहाशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६७४ वन्यप्राणी आढळून आले.

वन विभागाकडून जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणांवरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना केली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, शेकरू या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला आहे. वन विभाग क्षेत्रात रानडुक्कर, ससा, वानर या प्राण्यांची संख्या सतत वाढत आहे.

नदीकिनाºयावर १५ मगरी आढळल्या...
सांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदीकिनाºयावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला सुमारे १५ मगरी आढळून आल्याचीही माहिती संबंधित वन परिक्षेत्र विभागातून मिळाली. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे वन्यप्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात सोडण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे.
काटेकोर अंमलबजावणी
वन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात मांसभक्षीबरोबरच तृणभक्षी प्राण्यांत चांगली वाढ होऊ लागली आहे. नागरिकांनी या प्राण्यांना आपले मित्र म्हणून वागणूक द्यावी. त्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title:  Growth of the wildlife in the district - The effect of forest law and measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.