पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून बागणीत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:45+5:302021-05-24T04:26:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बागणी : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी नियमांचे पालन करायला हवे. गावा-गावांतील रुग्णसंख्या कमी करायची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बागणी : होम आयसोलेशनमधील रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी नियमांचे पालन करायला हवे. गावा-गावांतील रुग्णसंख्या कमी करायची असेल तर रुग्णांनी स्वतः अलगीकरण कक्षात दाखल व्हावे. यातून कोरोनाचा प्रसार थांबेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी वाळवा व बागणी येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
मंत्री पाटील यांनी रविवारी बागणी येथे भेट देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे व तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी तालुक्यातील गावनिहाय आढावा मांडला.
यावेळी सरपंच संतोष घनवट यांनी कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी जि. प. सदस्य संभाजी कचरे, पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, अप्पर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, एल. बी. माळी, सतीश काईत, उपसरपंच विष्णू किरतसिंग, ग्रामविकास अधिकारी नानासो कारंडे उपस्थित होते.