पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली पूरस्थितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 05:10 PM2021-07-27T17:10:46+5:302021-07-27T17:12:51+5:30
Flood Sangli JayantPatil : सांगली जिल्ह्यामध्ये पूराचे पाणी संथगतीने ओसरु लागले आहे. तरीही नदी काठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
सांगली : जिल्ह्यामध्ये पूराचे पाणी संथगतीने ओसरु लागले आहे. तरीही नदी काठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे अशा गावांना सर्वोतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी याभागाचा पूरपरिस्थिती पाहणी दौरा केला. यावेळी जीवनावश्यक वस्तुंचे वाटपही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याबरोबरच पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या निवारणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.