पालकमंत्री सुरेश खाडे यांची संपत्ती पंधरा वर्षांत झाली दुप्पट, एकूण मालमत्ता किती.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:15 PM2024-10-31T18:15:45+5:302024-10-31T18:16:13+5:30

५६ लाखांचे कर्ज : पत्नीच्या नावे ३९ लाखाची संपत्ती

Guardian Minister Suresh Khade BJP's candidate from Miraj Assembly Constituency has assets of 5 crores | पालकमंत्री सुरेश खाडे यांची संपत्ती पंधरा वर्षांत झाली दुप्पट, एकूण मालमत्ता किती.. वाचा

पालकमंत्री सुरेश खाडे यांची संपत्ती पंधरा वर्षांत झाली दुप्पट, एकूण मालमत्ता किती.. वाचा

सांगली : पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर व जंगम अशी एकूण मालमत्ता ५ कोटी ६७ लाख ९१ हजार ४७९ रुपये नमूद आहे. पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून येते.

खाडे यांनी तीनवेळा मिरज मतदारसंघातून निवडणूक लढविली आहे. त्यांचे शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या पंधरा वर्षांत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर जतमध्ये एक फौजदारी गुन्हा दाखल आहे. तीन निवडणुका जिंकणाऱ्या खाडे यांच्या नावावर २२ लाख ८९ हजार रुपयांची एक मोटार नोंद आहे. तीनशे ग्रॅम सोने त्यांच्या नावावर आहे. पेड, मोराळे, चिंचणी येथे शेतजमिनी, तर वासुंबे, मिरज, पुणे, पन्हाळा तालुका, नवी मुंबई, आदी ठिकाणी अन्य जागा त्यांच्या नावावर आहेत.

बँक ऑफ इंडियाकडे १० लाख ८५ हजारांंचे, डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडे ५ लाख ७० हजारांचे कर्ज नमूद करण्यात आले आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती दाखविण्यात आला आहे.

संपत्तीचे विवरण

  • जंगम मालमत्ता - १,१९,१७,२६९
  • स्थावर मालमत्ता - ४,३३,६२,०७३
  • वारसाप्राप्त मालमत्ता - १५,१२,१३७
  • कर्ज, देणी - ५६,४५,५०३


चार निवडणुकांमधील संपत्ती

  • २००९ - २,५३,१४,९७५
  • २०१४ - ४,८९,१७,५६४
  • २०१९ - ४,९६,३८,७५५
  • २०२४ - ५,६७,९१,४७९


पाच वर्षांत संपत्तीत ७१ लाखांची भर

सुरेश खाडे यांनी मागील निवडणुकीत दाखविलेल्या संपत्तीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीतील संपत्ती अधिक आहे. पाच वर्षांत ७१ लाख ५२ हजार ७२४ रुपयांची भर त्यांच्या संपत्तीत पडल्याचे दिसत आहे.

निवडणुकीत २७ लाखांवर खर्च

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश खाडे यांनी एकूण २७ लाख ९९ हजार ९७६ रुपयांचा खर्च केल्याचे दाखविण्यात आले आहे. यात बैठका, सभा, प्रचार यावर ४ लाख ३० हजार ८१७, प्रचार वाहनांवर ७ लाख २६ हजार ३०० रुपये, कार्यकर्त्यांवर २ लाख ३४ हजार ३८ रुपये, आदी खर्चाचा समावेश आहे.

Web Title: Guardian Minister Suresh Khade BJP's candidate from Miraj Assembly Constituency has assets of 5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.