विट्यात नाथ मंदिरातील गुढीपाडव्याची बैठक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:25 AM2021-04-13T04:25:16+5:302021-04-13T04:25:16+5:30
विटा : विट्याचे ग्रामदैवत श्री नाथ मंदिरात गुढीपाडव्यादिवशी परंपरेनुसार पंचांग वाचन, लिंब खाणे व यात्रेच्या नियोजनासंदर्भात होणारी नागरिकांची बैठक ...
विटा : विट्याचे ग्रामदैवत श्री नाथ मंदिरात गुढीपाडव्यादिवशी परंपरेनुसार पंचांग वाचन, लिंब खाणे व यात्रेच्या नियोजनासंदर्भात होणारी नागरिकांची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री नाथदेव उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली.
येथे श्री नाथ मंदिरात गुढीपाडव्याला मानकरी, पुजारी, यात्रा समितीचे पदाधिकारी व नागरिकांची बैठक होते. या बैठकीत सुरुवातीला पंचांग वाचन व लिंब खाण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर यात्रेचे नियोजन केले जाते. परंतु, यावर्षी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. शासनाने संचारबंदी व जमावबंदी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळावेत. गुढीपाडव्याच्या दिवशी श्री नाथ मंदिरात होणारी बैठक यावर्षी रद्द केली आहे. मात्र, मानकरी, गुरव हे धार्मिक पूजाअर्चा करतील. नागरिकांनी मंदिरात गर्दी करू नये. आपापल्या घरातच गुढीपाडव्याचा सण साजरा करावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.