Sangli: गुंड मध्या वाघमोडेचा कुंभारीत हवेत गोळीबार, दगडफेक करीत टोळीचा चौघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:58 AM2024-07-31T11:58:13+5:302024-07-31T11:58:46+5:30

तेरा वर्षांपूर्वी पाेलिसांवर गाेळीबार

Gund Madhya Waghmode firing in the air at Kumbari sangli | Sangli: गुंड मध्या वाघमोडेचा कुंभारीत हवेत गोळीबार, दगडफेक करीत टोळीचा चौघांवर हल्ला

Sangli: गुंड मध्या वाघमोडेचा कुंभारीत हवेत गोळीबार, दगडफेक करीत टोळीचा चौघांवर हल्ला

जत : माेक्काच्या कारवाईतील गुंड मध्या वाघमोडे याने कुंभारी (ता. जत) येथे हवेत गोळीबार करत धुडगूस घातला. त्याच्या टाेळीने दगडफेक करीत चाैघांवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री सात वाजता घडली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली.

मध्या वाघमोडे याच्यासह चाैघे रात्री कुंभारी येथे आले हाेते. बसस्थानकाजवळ असलेल्या एका पानटपरीवर त्याचा काहीजणांशी वाद झाला. यावेळी त्याने एकावर पिस्तूल रोखले. त्यानंतर हवेत गोळीबार केला. तेथून निघून जाताना त्याच्या टाेळीने समोर जो दिसेल त्याच्यावर दगडफेक करीत दहशत माजविली. दगडफेकीत चाैघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती घेत तपासाला गती दिली. रात्री उशिरापर्यंत मध्यासह टाेळीचा शाेध सुरू हाेता.

ग्रामस्थांचे रास्ता राेकाे आंदाेलन

अचानक घडलेल्या प्रकाराने गावात खळबळ उडाली. या टोळीस त्वरित पकडण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदाेलन केले. यामुळे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेआठ नंतर वाहतूक सुरळीत झाली.

तेरा वर्षांपूर्वी पाेलिसांवर गाेळीबार

तेरा वर्षांपूर्वी मध्या वाघमोडेने पकडण्यास आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या मांडीत गोळी घुसली होती. त्यानंतर मध्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. २०१६ मध्ये त्याच्या मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली हाेती. मोक्कामधून सहा महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

Web Title: Gund Madhya Waghmode firing in the air at Kumbari sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.