गुढे-पाचगणी पठारावर गारांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:51+5:302021-04-28T04:27:51+5:30
कोकरुड : गुढे-पाचगणीसह परिसरात सोमवारी रात्री गारांचा पाऊस पडून पठारावरील डबकी, तळी, बंधारे भरून वाहिल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्न काही ...
कोकरुड : गुढे-पाचगणीसह परिसरात सोमवारी रात्री गारांचा पाऊस पडून पठारावरील डबकी, तळी, बंधारे भरून वाहिल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी मार्गी लागला आहे.
सोमवारी सायंकाळपासून तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरुड, शेडगेवाडी, येळापूर, मेणीसह परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. गुढे-पाचगणीसह पठारावर सलग दुसऱ्या वर्षी गारांचा पाऊस पडला. सोमवारी रात्री पडलेल्या गारांच्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. पठारावर असणारी डबकी, नाले, तळी भरून वाहिली, तर बंधारे भरून गेले. मुसळधार पावसाने शेतातही पाणी साचले होते. अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या लोकांना अवकाळी पावसामुळे गारवा मिळाला.