पदवीधरचे अर्धा डझन उमेदवार सांगली जिल्ह्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:14 PM2020-11-12T13:14:48+5:302020-11-12T13:16:19+5:30
pune, padwidhar, elecation, kolhapurnews, sangli, satara, solapur पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचा सांगली जिल्हा हा केंद्रबिंदू बनला आहे. बहुतांश पक्षांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याला उमेदवारी देण्यास बहुतांश पक्षांनी पसंती दर्शविली.
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचा सांगली जिल्हा हा केंद्रबिंदू बनला आहे. बहुतांश पक्षांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील पाच जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्याला उमेदवारी देण्यास बहुतांश पक्षांनी पसंती दर्शविली. पुणे पदवीधर मतदारसंघाचे रणांगण सध्या सुरू आहे. विविध पक्षांनी या निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.
जिल्ह्यातील अनेकांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली आहे. भाजपने संग्रामसिंह देशमुख यांना, राष्ट्रवादीने अरुण लाडना, जनता दलातर्फे प्रा. शरद पाटील, आपतर्फे डॉ. अमोल पवार, भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे शंकर पुजारी, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व उमेदवार सांगली जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणाचे केंद्र म्हणून जिल्ह्याकडे पाहिले जात आहे.
जिल्हानिहाय मतदारसंख्या
- कोल्हापूर ८७९५८
- सांगली ८५८२७
- पुणे ८५६१९
- सातारा ५६१२६
- सोलापूर ४८९१९
(ऑनलाईन नोंदणीनुसार यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे)