शिक्षक बँकेत अर्धा डझन वर्षात सव्वा डझन अध्यक्ष..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:18 AM2021-07-11T04:18:58+5:302021-07-11T04:18:58+5:30
शिंदे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी शिक्षक समितीचे तेरा व शिक्षक संघांचे आठ संचालक निवडून दिले. बहुमताच्या ...
शिंदे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधारी शिक्षक समितीचे तेरा व शिक्षक संघांचे आठ संचालक निवडून दिले. बहुमताच्या आधारावर शिक्षक समितीने सत्त्ता स्थापन केली, पण सभासद हिताकडे सपशेल दुर्लक्ष केले. निवडून आलेल्या तेरा संचालकांमधून पंधरा अध्यक्ष निवडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. गेली दोन वर्षे ठेवी व कर्जाच्या व्याजदरात सहा ते सात टक्के तफावत ठेवून मलिदा खाण्यात कारभारी व्यस्त आहेत. जुलै महिना संपला तरी नफा जाहीर केलेला नाही.
अविनाश गुरव म्हणाले, बेसुमार नोकरभरती, संगणक दुरुस्ती घोटाळा आणि भ्रष्ट कारभार, यामुळे काही झाले तरी आता सभासद शिक्षक संघाच्या हातात सत्तेची सूत्रे देणार, हे निश्चित आहे. त्यामुळे सामान्य सभासदांच्या पाठबळावर शिक्षक बँकेत सत्तांतर नक्की करणार आहेत.
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक सुधाकर पाटील, महादेव हेगडे, बाजीराव पाटील, शामगोंडा पाटील, शोभा पाटील, पोपट सूर्यवंशी, तानाजी खोत, अरुण पाटील, हंबीरराव पवार, फत्तेसिंग पाटील, धनंजय नरुले, संजय दिवे, दगडू येवले, अशोक पाटील, नानासाहेब कांबळे, दिलीप सानप, अशोक महिंद उपस्थित होते.
काेट
सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या ६२ लाख बक्षीस पगाराबाबत सभासदांत प्रचंड नाराजी आहे. सत्ताधारी कर्मचाऱ्यांना पुढे करून मलिदा खाण्याच्या तयारीत असल्याची भावना सभासद बोलून दाखवत आहेत. त्यामुळे निवडलेला नवा कारभारी बक्षीस पगाराचा ठराव रद्द करणार की सत्तेच्या साठमारीत वाहत्या गंगेत हात धुऊन घेणार, याकडे सभासदांचे लक्ष आहे.
- सुधाकर पाटील, संचालक, शिक्षक बँक