संख येथे अतिक्रमणांवर हतोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:41+5:302021-02-13T04:26:41+5:30

संख : संख (ता. जत) येथे शुक्रवारी बसस्थानक परिसरातील सर्व अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली. यावेळी उमदी पोलिसांनी कडेकोट ...

Hammer on encroachments at Sankh | संख येथे अतिक्रमणांवर हतोडा

संख येथे अतिक्रमणांवर हतोडा

Next

संख : संख (ता. जत) येथे शुक्रवारी बसस्थानक परिसरातील सर्व अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली. यावेळी उमदी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

परिसरात पानटपरी, चहागाडा, कॅटिंग दुकान, फुलांचे दुकान, कापड, इलेक्ट्रिकल दुकानांचे अतिक्रमण होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व खोकी मालकांना आठ दिवसात अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस दिली होती. परंतु त्यांनी अतिक्रमण न काढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने उमदी पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण केलेली सर्व खोकी हटविली.

उपअभियंता डी. पी. डोंगरे, शाखा अभियंता पी. पी. शिंदे, उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, कनिष्ठ अभियंता आर. बी. राजगे, स्थापत्य अभियंता सहायक डी. एम. कारंडे, हवालदार नागेश खरात, मैलकुली मजूर यांनी कारवाईत भाग घेतला.

पर्यायी जागेची मागणी

बसस्थानक परिसरातील दुकाने हटविल्याने आता व्यवसाय बंद झाला आहे. यामुळे संबंधित व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन अतिक्रमण हटविण्याची गरज होती. यामुळे आता पर्यायी जागेची मागणी होत आहे.

फोटो-१२संख१.२.३.४.५

फोटो ओळ :

संख (ता. जत) बसस्थानक परिसरात अतिक्रमण केलेली खोकी सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविली.

Web Title: Hammer on encroachments at Sankh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.