माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:12 PM2022-09-05T12:12:49+5:302022-09-05T12:13:12+5:30

पती, सासू व सासरा यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद

Harassment of married woman in Sangli for 10 lakhs, case registered | माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

माहेरहून १० लाख आणण्यासाठी सांगलीत विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

googlenewsNext

सांगली : लग्नात सासरच्या लोकांचा मानपान केला नाही व चुरमुरे फॅक्टरीसाठी १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. याप्रकरणी अंजली महेश्वर जवळे यांनी पती महेश्वर कांतेश्वर जवळे, सासू सिंधूताई कांतेश्वर जवळे व सासरा कांतेश्वर दिगंबर जवळे (रा. माधवनगर रोड, सांगली) यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ जून २०१५ पासून आजअखेर हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. माहेरच्या लोकांनी लग्नात व मुलाच्या बारशात सासरच्या लोकांना व त्यांच्या पाहुण्यांचा मानपान केला नाही यावरून व चुरमुरे फॅक्टरीसाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत यासाठी सासरचे लोक शारीरिक व मानसिक त्रास देत होते, असे अंजली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Harassment of married woman in Sangli for 10 lakhs, case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.