पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 03:53 PM2022-08-03T15:53:52+5:302022-08-03T15:54:17+5:30

‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली.

harassment of wife, attempted murder of son in law by three in laws in sangli | पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

Next

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे मुलीला त्रास देत असल्याने सासरच्या तिघांनी लाकडी दांडक्याने जावयाचे डोके फोडत खुनाचा प्रयत्न केला. हा प्रकार ३० जुलैरोजी दुपारी अडीच वाजता घडला. या हल्ल्यात विजय तानाजी जाधव (वय ३५, रा. शिवाजीनगर, बोरगाव) गंभीर जखमी झाले आहेत. ते बेशुद्धावस्थेत असून, त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

याबाबत विजय यांची आई कलाबाई तानाजी जाधव (वय ५०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मधुकर कवठेकर, मधुकर आनंद कवठेकर आणि राजश्री मधुकर कवठेकर (तिघे रा. शिवाजीनगर, बोरगाव) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विजय आई आणि पत्नीसोबत बाेरगाव येथे राहतात. पत्नी नीलम हिचे माहेर घराशेजारीच आहे. या दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. चार दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाल्यावर नीलम माहेरी गेली होती. तिला बोलविण्यासाठी शनिवारी विजय तिच्या घरी गेले होते. त्यावेळी मेहुणा प्रशांत व सासू-सासऱ्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रशांत याने ‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली.

डोके फुटल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ते बेशुद्धावस्थेत असून, त्यांच्यावर कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

Read in English

Web Title: harassment of wife, attempted murder of son in law by three in laws in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.