प्रकाश हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीची हार्डडिस्क पोलिसांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:29+5:302021-05-27T04:29:29+5:30

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्धारित दरापेक्षा जादा रक्कम घेतली. तसेच उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यावर बिलापोटी ...

Hard disk of CCTV in Prakash Hospital to police | प्रकाश हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीची हार्डडिस्क पोलिसांकडे

प्रकाश हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीची हार्डडिस्क पोलिसांकडे

Next

इस्लामपूर : येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी निर्धारित दरापेक्षा जादा रक्कम घेतली. तसेच उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यावर बिलापोटी आणखी पैशाची मागणी करून मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेसह आणखी दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

नंदू नामदेव कांबळे (जयसिंगपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंद्रजित पाटील, अभिमन्यू पाटील, विश्वजित पाटील, प्रवीण माने आणि एका अनोळखीविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.

पिंगळे यांनी बुधवारी दुपारी हॉस्पिटलमधील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या अनुषंगाने हार्डडिस्क आणि डिव्हीआर ताब्यात घेतला आहे. संशयित आणि मृत रुग्णाच्या नातेवाईक यांच्यामधील संभाषण मिळवण्यासाठी मोबाईल कॉल डिटेल्सचे विवरण तपासले जात असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

Web Title: Hard disk of CCTV in Prakash Hospital to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.