कोरोनाचा कहर : १११६ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:29+5:302021-04-22T04:28:29+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर बनत आहे. बुधवारी दिवसभरात १११६ नवीन रुग्ण आढळले, तर जिल्ह्यातील २२ आणि ...

Havoc of corona: 1116 new patients, 22 deaths | कोरोनाचा कहर : १११६ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

कोरोनाचा कहर : १११६ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर बनत आहे. बुधवारी दिवसभरात १११६ नवीन रुग्ण आढळले, तर जिल्ह्यातील २२ आणि परजिल्ह्यातील ६ अशा २८ जणांचा मृत्यू झाला. खानापूर तालुक्यात २०२, तर महापालिका क्षेत्रात २३९ रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने चिंता वाढली आहे. बुधवारी १११६ रुग्णांची नोंद होताना २२ मृत्यू झाले. यात सांगली शहर ५, पलूस, वाळवा प्रत्येकी ४, खानापूर, मिरज तालुका प्रत्येकी ३, तर आटपाडी, कवठेमहांकाळ आणि मिरज शहरात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाच्यावतीने तपासणीचे प्रमाण वाढविले असून, बुधवारी दिवसभरात ५६०६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात आरटीपीसीआरअंतर्गत २१३५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ६०७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड अन्टिजेनचे २४७१ तपासणीतून ५६१ जणांना बाधा झाली आहे.

उपचार घेत असलेल्या ८९९६ रुग्णांपैकी १४९९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १३२० जण ऑक्सिजनवर, तर १६९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील सोलापूर १४, कोल्हापूर २८, सातारा ३, कर्नाटक ४, रत्नागिरी २ आणि पुणे येथील १ अशा ५२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ६४२९३

उपचार घेत असलेले ८९९६

कोरोनामु्क्त झालेले ५३३०६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १९९१

बुधवारी दिवसभरात

सांगली १७५

मिरज ६४

खानापूर २०२

वाळवा १८४

मिरज तालुका १०५

तासगाव ९५

कडेगाव ८१

आटपाडी ५८

जत ४७

शिराळा ३८

पलूस ३५

कवठेमहांकाळ ३२

चौकट

दिवसभरात २४ हजार जणांचे लसीकरण

प्रशासनाने लसीकरणावरही भर दिला आहे. बुधवारी दिवसभरात २४९५२ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यात महापालिकेच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांत ३६६९ जणांना, तर ग्रामीण भागात १९ हजार १५९ आणि सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांत २१२४ जणांना लस देण्यात आली.

Web Title: Havoc of corona: 1116 new patients, 22 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.