कुपवाडचा हजरत लाडले मशायक उरूस रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:25 AM2021-03-06T04:25:13+5:302021-03-06T04:25:13+5:30
कुपवाड : शहरातील हजरत लाडले मशायक व बडे पीर यांचा उरूस यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ...
कुपवाड : शहरातील हजरत लाडले मशायक व बडे पीर यांचा उरूस यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय दर्गा कमिटी आणि पोलीस प्रशासन यांच्या बैठकीत घेण्यात आला. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पाडण्यात येणार आहेत.
यंदाचा ६८५ वा उरूस असून शुक्रवार (दि. ५), आज, शनिवारी बडे पीर व हजरत लाडले मशायक यांचा उरूस साजरा होत आहे. उरुसासाठी परराज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या निमित्ताने दरवर्षी मोठी गर्दी होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, भाविकांच्या आरोग्याचा विचार करून दर्गा कमिटी, पोलीस प्रशासन, पदाधिकारी यांच्या बैठकीत उरूस रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दर्गा सरपंच कासिम मुजावर व सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली. उरुसाच्या कालावधीत मनोरंजन कार्यक्रम, कुस्ती मैदान, गलेफ, दंडवत घालणे, नैवेद्य, आदी कार्यक्रम होणार नाहीत. दर्गा परिसरात कोणत्याही प्रकारचे स्टॉल, विविध विक्रेते यांना उरुस कालावधीत व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.