‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

By admin | Published: May 22, 2017 11:24 PM2017-05-22T23:24:07+5:302017-05-22T23:24:07+5:30

‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

'He' did the bath with which soap? | ‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

‘त्यांनी’ कोणत्या साबणाने अंघोळ केली?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज पॅटर्नचे नाव घेऊन काहीजण स्वत:च्या पक्षाची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधीकाळी तेही मिरज पॅटर्नमध्येच नांदायला होते. कोणत्या साबणाने अंघोळ करून ते स्वच्छ झाले? मिरजेतील नगरसेवक कोणाच्या दारात पक्षप्रवेशासाठी गेलेले नाहीत. उलट त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच आमच्या घरात घुसून, पक्षात या, असे साकडे घालत आहेत, अशा शब्दात माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत भाजप व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
माजी महापौर इद्रिस नायकवडी, मैनुद्दीन बागवान, विवेक कांबळे, नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार बैठक घेऊन मिरज पॅटर्नची भूमिका मांडली. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मिरज पॅटर्नमधील नगरसेवकांना पक्षात घेऊ नये, अशी मागणी नुकतीच करण्यात आली होती. तसेच भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही मिरज पॅटर्नला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर मिरजेतील नगरसेवकांनी एकत्रित येत भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला.
नायकवडी म्हणाले की, मिरज पॅटर्नमधील नगरसेवकांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. पण आम्ही कोणाच्या दारात गेलो आहे? त्यांच्याकडे पक्षात प्रवेश द्या, म्हणून साकडे घातले आहे? उलट त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. खालचे कार्यकर्ते वाचाळवीराप्रमाणे व्यक्तव्ये करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मंडळींनी कोल्हेकुई बंद करावी. २०१८ च्या निवडणुकीची भाषा ते करीत आहेत. पण त्यांनी एक तरी नगरसेवक निवडून आणला आहे का?
मिरजेतील जनमानसात आमची चांगली प्रतिमा असल्याने आम्ही एकत्र आलो. जनतेची कामे करीत असल्याने कधी पक्ष, नेत्यांची गरज भासली नाही. मिरजेतील १४ नगरसेवक एका विचाराने एकत्र आले आहेत. सांगली व कुपवाडचे पाच नगरसेवकही संपर्कात आहेत.
ही मंडळी एकत्र आली, तर आमचे काय होणार, याची चिंता त्यांना सतावत आहे. या भीतीपोटीच मिरज पॅटर्नचे नाव घेऊन बदनामी सुरू आहे. कधीकाळी हीच मंडळी मिरज पॅटर्नमध्ये नांदायला होती. आता ती स्वच्छ असल्याचा आव आणत आहेत. त्यांनी कोणत्या साबणाने अंघोळ केली आहे? असा टोलाही त्यांनी लगाविला.
आम्ही कुठल्याही पक्षाच्या मागे लागलेलो नाही. उलट भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसची नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. तेच आमच्या दारात घुसत आहेत. आगामी वर्षभर आम्ही सर्वांशी विचारविनिमय करू. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे नायकवडी यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'He' did the bath with which soap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.