‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

By admin | Published: December 11, 2015 12:09 AM2015-12-11T00:09:51+5:302015-12-11T01:06:41+5:30

नातेवाईकांकडूनच खून : मोबाईलवरून उलगडा

The head constable wife of 'Dorley' was murdered | ‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

Next

जत : जत तालुक्यातील डोर्ली येथे २५ नोव्हेंबर रोजी विठोबा मुकिंदा सरगर (वय ८०, रा. कोंबडवाडी, (कोळी), ता. सांगोला जि. सोलापूर) यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार त्यांची पत्नी लक्ष्मीबाई विठोबा सरगर (वय ७०) ही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजी महादेव लवटे (वय २४, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) व सागर तुकाराम म्हारगुडे (२१, रा. तळेवाडी, ता. आटपाडी) या दोघांनी संगनमत क रून हा खून केला आहे. या तिघांनी खुनाची कबुली दिली आहे.
त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, १९ डिसेंबरअखेर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विठोबा सरगर याने शिवाजी लवटे यास ७ हजार रुपये हातऊसने दिले होते. या प्रकरणात लक्ष्मीबाई हिने मध्यस्थी केली होती. वारंवार पैसे परत मागूनही त्याने दिले नाहीत. त्यामुळे विठोबा सरगर हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिला तू मध्यस्थी क रून पैशाची हमी घेतलीस; परंतु त्याने पैसे परत केले नाहीत म्हणून तो तिला सतत मारहाण करत होता.
तुला पैसे दिल्यामुळे विठोबा मला सतत मारहाण करून त्रास देत आहे. त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असे लक्ष्मीबाईने शिवाजी लवटे यास सांगितले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजी पैसे परत करणार आहे, ते तुम्ही घेऊन या, असे लक्ष्मीबाईने पती विठोबा यास सांगून एसटीने नागज फाटा येथेपाठविले होते. तोपर्यंत शिवाजी याने सागर यास बोलावून घेतले होते.
विठोबा एसटीमधून उतरल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीवरून ढालगाव व कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे जाऊन मद्य प्राशन केले होते. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान ते डोर्लीजवळ असलेल्या मानेवाडी ते दुधाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सखाराम नाथा माने यांच्या शेताजवळ आले होते. तेथून शिवाजी व सागर याने लक्ष्मीबाईच्या सांगण्यावरून त्यांचा खून करून मृतदेह माने यांच्या शेतातील नाला बांधाच्याखाली टाकला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बेवारस मृतदेह सापडला म्हणून महादेव धोंडीबा बंडगर (रा. डोर्ली) याने जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. निरीक्षक श्रीकांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवून, दोन दिवसात दोन मारेकऱ्यांना व ७ डिसेंबर रोजी लक्ष्मीबाईस अटक केली आहे. (वार्ताहर)


पोलिसांच्या कसून चौकशीतून निष्पन्न
संशयित आरोपी शिवाजी लवटे याची लक्ष्मीबाई ही आत्या आहे, तर सागर म्हारगुडे याची मावशी आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉल तपशिलावरून, लक्ष्मीबाई सरगर या पती विठोबा यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत, याचा उलगडा झाला आहे.

Web Title: The head constable wife of 'Dorley' was murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.