कोकरूडमध्ये ‘सर्वांना आरोग्य’चा फज्जा

By admin | Published: February 14, 2016 12:50 AM2016-02-14T00:50:11+5:302016-02-14T00:50:11+5:30

तीव्र आंदोलनाचा इशारा : ग्रामस्थांकडून रुग्णालय प्रशासन धारेवर

'Health of All Health' in Cancer | कोकरूडमध्ये ‘सर्वांना आरोग्य’चा फज्जा

कोकरूडमध्ये ‘सर्वांना आरोग्य’चा फज्जा

Next

कोकरूड : ‘सर्वांना आरोग्य’ या संकल्पनेचा कोकरूड येथे पूर्ण फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या भोेंगळ कारभाराविरोधात येथील ग्रामस्थ व रुग्णांनी जोरदार वादावादी व बाचाबाचीने दोन तास परिसर निनादून सोडला. या प्रकारामुळे दोन्ही रुग्णालयांविरोधात असंतोष वाढला आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय हे एकाच इमारतीमध्ये कार्यरत आहे. येथील तृतीय व चतुर्थ क र्मचारी व डॉक्टर उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून पैशाची मागणी करत असतात व उपचार करण्याबाबत दिरंगाईही करत असतात. रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणे, खासगी मेडिकलमधून औषध आणण्यास सांगणे, असे प्रकारही येथे घडले जातात.
दोन्ही रुग्णालयांचा कारभार एकाच ठिकाणी चालत असल्याने वैद्यकीय अधिकारी आपली जबाबदारी टाळून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. मोफत औषध मिळत असतानाही येथील डॉक्टर बाहेरून औषधे आणण्यास का सांगतात, असा सवालही रुग्ण करत आहेत.
सर्वांना आरोग्य ही संकल्पना मोफत असल्याने गरीब, कष्टकरी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्णालयामध्ये येतात. वर्षाभरापूर्वी जाब विचारूनही जर प्रशासनाल जाग येत नसेल, तर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी लैलाबी मुलाणी, आनंदी घोडे, ताराबाई चव्हाण, लक्ष्मी लोखंडे, आनंदी इजारे, नदीना मुलाणी या ज्येष्ठ नागरिकांकडून रुग्णालयाने पैसे आकारले असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील अकरापैकी यावेळी डॉ. सलमा ईनामदार, पंकज प्रगट, शारदा कांबळे, पी. डी. पोस्कर, शिपाई पाटील, एस. एस. जांभळे असे सहाच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संघटनेचे कृष्णा नांगरे, विकास घोडे उपस्थित होते. (वार्ताहर)
 

Web Title: 'Health of All Health' in Cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.