संजयनगर येथे पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:06+5:302021-06-05T04:20:06+5:30
फोटो ओळी : संजयनगर पोलीस ठाणे येथे आरोग्य शिबिरावेळी काकासाहेब पाटील, महेश डोंगरे, विष्णू माळी, उमेश चिकणे, दिनेश माने, ...
फोटो ओळी : संजयनगर पोलीस ठाणे येथे आरोग्य शिबिरावेळी काकासाहेब पाटील, महेश डोंगरे, विष्णू माळी, उमेश चिकणे, दिनेश माने, डॉ. शुभम जाधव, डॉ. प्रियंका यमगर, डॉ. गौरी वाघमारे, डॉ. नीलेश पाटील आदी उपस्थित होते. छाया : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाणे येथे निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या पुढाकाराने पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याचा पोलीस आधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये ५४ पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन औषधे देण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू माळी, पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, दिनेश माने, डॉ. शुभम जाधव, डॉ. प्रियंका यमगर, डॉ. गौरी वाघमारे, डॉ. नीलेश पाटील, सतीश कट्टीमणी, सूरज कोळी, अनिरुद्ध कुंभार, प्रथमेश खिलारे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.