आरोग्य राज्यमंत्र्यांनी वाटला कोरोनाचा प्रसाद - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 03:12 PM2020-09-20T15:12:31+5:302020-09-20T15:14:07+5:30
आरोग्य राज्यमंत्र्यांनी मला आताच सांगितले की त्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांच्यात आता अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. हा आजारच असा आहे की, काहींना तो होऊन गेल्याचे कळत नाही.
आमच्याकडील नेत्यांना सर्वांना जवळ घ्यायची सवय
सांगली - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कोरोना होऊन गेल्याचे समजले नाही. नुकत्याच केलेल्या चाचणीत त्यांच्यामध्ये अँटीबॉडिज तयार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोरोनाचा अनेकांना प्रसाद वाटला असणार हे नक्की, मात्र त्यात त्यांचा काही दोष नाही. सर्वांना जवळ घ्यायची आमच्याकडील नेत्यांना सवय आहे, त्यामुळे हे असे घडते, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगलीत एका डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, आरोग्य राज्यमंत्र्यांनी मला आताच सांगितले की त्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांच्यात आता अँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. हा आजारच असा आहे की, काहींना तो होऊन गेल्याचे कळत नाही. तोपर्यंत ते प्रसाद वाटत असतात. आरोग्य राज्यमंत्र्यांनीही कितीजणांना तरी असा प्रसाद वाटला असणार, मात्र त्यात त्यांचा व प्रसाद घेणाºयांचा काही दोष नाही. त्यामुळे नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे. आमच्याकडील नेत्यांना प्रत्येकास कडेवर घ्यायची सवय लागली आहे. आता ती बदलावी लागेल.