संजय पवार पदावनतप्रकरणी ६ जानेवारीला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:31+5:302020-12-31T04:27:31+5:30
जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील पाणी योजनांची कामे संजय पवार यांनी पत्नीच्या नावे घेतली होती. शासकीय ...
जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील पाणी योजनांची कामे संजय पवार यांनी पत्नीच्या नावे घेतली होती. शासकीय पदाचा गैरवापर केल्याचा ठपका पवार यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने ठेवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. फौजदारी गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर शाखा अभियंता संजय पवार यांची पदावनत करून स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे केले आहे. याप्रकरणी पवार यांनी शासनाकडे दाद मागितली होती. या प्रकरणाची सुनावणी दि. ६ जानेवारीरोजी मंत्रालय येथे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
विभागीय चौकशीही सुरू
संजय पवार यांची विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या माध्यमातून विभागीय चौकशीही चालू आहे. या चौकशीनंतर पवार यांच्या बडतर्फची कारवाई करायची की नाही, यावर विभागीय आयुक्त निर्णय घेणार आहेत, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.