शिराळ्यात मोरणाकाठी स्वर्गीय नर्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:25 PM2019-04-08T23:25:47+5:302019-04-08T23:25:53+5:30

सहदेव खोत । लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रा. ...

Heavenly dancer | शिराळ्यात मोरणाकाठी स्वर्गीय नर्तक

शिराळ्यात मोरणाकाठी स्वर्गीय नर्तक

Next

सहदेव खोत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : चिखली (ता. शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्राच्या प्रा. डॉ. रेखा देवकर यांना शिराळा येथे मोरणा नदी परिसरात ‘स्वर्गीय नर्तक’ या दुर्मिळ पक्ष्यांची जोडी दृष्टीस पडली. सुमारे तासाभराच्या निरीक्षणात देवकर यांनी या पक्ष्यांच्या हालचाली टिपल्या.
शिराळ्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूने मोरणा नदी वाहते. नदी परिसरात मुबलक झाडी आहे. शिराळा ते नाथ फाटा रस्त्यावरील बंधाऱ्यावरून डॉ. देवकर यांना रविवारी सकाळी ११:३० च्या दरम्यान पॅराडाइज फ्लायकॅचर अर्थात ‘स्वर्गीय नर्तक’ यांचा वावर आढळला.
दुर्मिळ असणाऱ्या या पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. परंतु लांब शेपटी असणाºया प्रामुख्याने दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात, तर दुसरी श्रीलंका येथे आढळते. त्याचे इंग्रजी नाव ‘एशियन पॅराडाईज फ्लायकेचर’ आहे, तर शास्त्रीय भाषेत त्याला ‘टेरसिफोन पॅराडाईज’ असे म्हणतात. नराला लांब शेपूट असते. त्यामुळे तो अतिशय सुरेख व देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढºया रंगाचा असतो, तर नवतरुण नर आणि मादी लाल रंगाची असते. याची मान व चोचीकडील भाग काळपट जांभळ्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्यावर लहानसा तुरा असून, त्याची शेपटी दोन पिसांची एक ते दीड फुटापर्यंत लांब असते. हिमालय व उत्तर प्रदेशमधील डोंगररांगांमध्ये याचा जास्त वावर दिसतो. हा मध्य प्रदेशचा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी हवेत संचार करतेवेळी हळुवार हवेत दोन तीन फुटांपर्यंत वर-खाली, वर-खाली करत एकीकडून दुसºया जागी जातो. त्यावेळी शेपटीतील दोन्ही पिसांची हालचाल कापडी रिबन हवेमध्ये फिरल्यासारखी दिसते. त्याचा आहार लहान किडे व अळ्या असतो. आपल्याकडे या पक्ष्यांचा वावर हा आंबा घाटातील विशाळगड रोडशेजारी जंगलात आहे; तर काही पक्षी निरीक्षकांना तो इचलकरंजी या भागात नदीकडील प्रदेशात आढळला असल्याचे बोलले जाते. आता शिराळ्याजवळील नदीकाठी दाट झाडीत पांढºया रंगाची शेपटी असलेला हा पक्षी दिसला. सुमारे पाऊण तास नर्तक पक्ष्यांची जोडी तेथील पाणवठ्याजवळ वावरताना दिसली.

Web Title: Heavenly dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.