संख येथे मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:51+5:302021-06-06T04:20:51+5:30
संख : जत तालुक्यात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. संख, दरीबडची, माडग्याळ या परिसराला शनिवारी दुपारी एक तास ...
संख : जत तालुक्यात शनिवारी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. संख, दरीबडची, माडग्याळ या परिसराला शनिवारी दुपारी एक तास पावसाने झोडपून काढले. सर्वत्र पाणीच पाणी झाले. डाळिंब, द्राक्षे फळबागांना फायदा होणार आहे. पूर्व भागातील दरीबडची, संख, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, बेळोंडगी परिसरात शुक्रवारी रात्री मोठा पाऊस झाला. परत शनिवारी दुपारी दरीबडची, संख, पांडोझरी परिसरात एक तास पाऊस झाल्याने सर्वत्र रस्त्यावरून पाणी वाहून जात होते.
शेतामध्येही पाणी साचले आहे. अनेक भागांतील नाले-ओढे तुडुंब भरून वाहत होते. खरीप हंगामातील पिकांची पेरणीला सुरुवात होणार आहे. भाजीपाला, ऊस, उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे.
पूर्व भागात मे महिन्याच्या शेवटी विहीर, कूपनलिकातील पाणी पातळी कमी झाली होती. यंदा जून महिन्यात चार वर्षांनी प्रथमच मान्सूनपूर्व पाऊस आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
फोटो ओळ : संख (ता. जत) येथे मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी लावली.