सांगली परिसरात जोरदार पाऊस
By admin | Published: October 11, 2015 12:10 AM2015-10-11T00:10:16+5:302015-10-11T00:13:52+5:30
शहर जलमय : गुंठेवारी भागात दलदल
सांगली : सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगली शहर व परिसरात शनिवारी पुन्हा पावसाचे आगमन झाले. सायंकाळी ४ पासून दीड तास शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले असून, गुंठेवारीत दलदल निर्माण झाली आहे.
सांगली शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी चार वाजता जोरदार पावसास सुरुवात झाली. दीड तास पावसाचा मुक्काम होता. या पावसाने शहरातील स्टेशन रोड, शिवाजी मंडई, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, स्टँड परिसरात पाणी साचून राहिले होते. शहरातील शामरावनगर भागात पुन्हा दलदल निर्माण झाली आहे. या भागाताील सर्वच कॉलन्यांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले असून, सांडपाणीही रस्त्यावर आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शामरावनगर परिसरातील पाण्याचा निचरा होऊ लागला होता, त्यातच आज पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पाणी साचून राहिले. मिरज शहरात याचवेळी तुरळक पाऊस झाला. सांगली, मिरजेत रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)