सांगली जिल्'ात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:37 PM2017-09-07T21:37:15+5:302017-09-07T21:38:23+5:30

सांगली : जिल्'ातील बहुतांश तालुक्यांमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

 Heavy rain in Sangli district | सांगली जिल्'ात मुसळधार पाऊस

सांगली जिल्'ात मुसळधार पाऊस

Next
ठळक मुद्देशेतकºयांना दिलासा : बहुतांश तालुक्यांमध्ये हजेरीतब्बल महिन्यानंतर बरसलेल्या सरीं

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्'ातील बहुतांश तालुक्यांमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्'ाच्या बहुतांश भागावर दुष्काळाचे सावट होते. पण पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीत दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी तीनपर्यंत कायम होता. त्यानंतर जोर ओसरला तरी, पावसाची रिपरिप सुरूच होती.

सांगली, मिरजेला जलमय स्वरुप प्राप्त झाले होते. मिरज पूर्व भागातील मालगाव, टाकळी, बोलवाड यासह अनेक गावांत पडलेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून येथील शेतकरी चिंतेत होता. शिराळा तालुक्यासही गुरुवारी मुसळधार पावसाने झोपडले. दुपारी चारनंतर विजेच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका पिकांना जीवदान मिळाले आहे.

पलूस तालुक्यात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आदी पिकांना जीवदान मिळाले आहे. कडेगाव तालुक्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. देवराष्ट्रे, वांगी, चिंचणी, आसद, मोहित्यांचे वडगाव, सोनकिरे, शिरसगाव, सोनसळ, पाडळी, अंबक, शिरगाव, कुंभारगाव, रामापूर, तडसर परिसरात दुपारपासून दमदार पाऊस झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातही गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल महिन्यानंतर बरसलेल्या सरींनी येथील शेतकºयांना दिलासा दिला.
 

 

Web Title:  Heavy rain in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.