सांगली, मिरजेत जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 08:09 PM2020-09-02T20:09:26+5:302020-09-02T20:14:55+5:30
सांगली, मिरज शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते.
सांगली : सांगली, मिरज शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले होते.
शहरांत दिवसभर ढगांची दाटी होती. सायंकाळी साडे सहा वाजता पावसास सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
सांगलीला ंिचंब भिजविले. कॉंग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक परिसर, शिवाजी मंडई, बसस्थानक परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचून राहिले.
सायंकाळी बाजारात खरेदीसाठी आलेले ग्राहक व विक्रेत्यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली होती.
मिरज शहरालाही पावसाने झोडपून काढले. मिरज मार्केट परिसरात पाणी साचले होते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आगामी सहा दिवसात पावसाच्या तुरळक सरी हजेरी लावणार आहेत.