शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:13+5:302021-09-08T04:32:13+5:30

कोकरुड : गेल्या दोन दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना उभारी मिळाली आहे. शेतकऱ्यांना ...

Heavy rainfall in the western part of Shirala | शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर

शिराळा पश्चिम भागात पावसाचा जोर

Next

कोकरुड : गेल्या दोन दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना उभारी मिळाली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला असून, ओढे, नाले भरुन वाहू लागले आहेत.

शिराळा पश्चिम भागातील कोकरुडसह शेडगेवाडी, येळापूर, चरण, आरळा, मणदूर, मेणी, गुढे-पाचगणी पठारावर सोमवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरल्याने ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. हा पाऊस खरीप हंगामातील भात, भुईमूग यांना पूरक ठरला आहे. अतिवृष्टीमुळे उरलेल्या खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळणार असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

संततधार पावसामुळे डोंगर, दरी, माळ अशा ठिकाणी गवत चाऱ्याची चांगली उगवण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: Heavy rainfall in the western part of Shirala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.