सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

By अशोक डोंबाळे | Published: July 22, 2024 03:23 PM2024-07-22T15:23:36+5:302024-07-22T15:24:42+5:30

जिल्ह्यात २८.२ मिलिमीटर पाऊस : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर

Heavy rains in Shirala Sangli district; Varana, Bahe, Takarit cloudburst | सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ७७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा (चांदोली) धरण परिसर, वाळवा तालुक्यातील बहे, ताकारी आणि कासेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या ठिकाणी १०० ते १२५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २८.२ मिलिमीटर पाऊस झाला असून कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवारी दुपारी २६ फुटापर्यंत पाणीपातळी पोहोचली आहे.

जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरु झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण, शिराळा, कोकरुड परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा-चांदोली धरण परिसरात चौवीस तासात १०४.८ मिली मीटर वाळवा तालुक्यातील बहे १२५.८ मि.ली., कासेगाव ९५.३ मि.ली., ताकारी परिसरात १२५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी ढगफुटी सदृश्य असाच पाऊस होता, असे सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी दुपारी कृष्णा नदीचीसांगली आर्यविन पुल येथे २६ फुटापर्यंत पाणीपातळी गेली होती.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २१.५ (३४३), जत २ (२५५.८), खानापूर १२.१ (२७६.५), वाळवा ६०.८ (५१८.३), तासगाव १४.१ (३४२.४), शिराळा ७७.८ (७२२.१), आटपाडी २.४ (२२८.३), कवठेमहांकाळ ७.६ (३४०), पलूस ३२.३ (३५७.८), कडेगाव २२.७ (३४५).

अलमट्टीतून दीड लाख क्युसेकने विसर्ग

अलमट्टी धरणात ९३.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात सध्या एक लाख १५ हजार ४०६ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. कृष्णा खोऱ्यात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी धरण प्रशासनाने सोमवारी एक लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरणातून आणखी विसर्ग वाढविण्यात येईल, असे अलमट्टी धरण प्रशासनाने सांगली पाटबंधारे मंडळाला आश्वासन दिले आहे.

Web Title: Heavy rains in Shirala Sangli district; Varana, Bahe, Takarit cloudburst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.