सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 03:24 PM2019-11-01T15:24:39+5:302019-11-01T15:25:45+5:30

पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

Hell again on Sangli-Peth road | सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

सांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना

googlenewsNext
ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्यावर पुन्हा नरकंयातना...टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही, प्रवाशांचे हाल

अविनाश कोळी 

सांगली : पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग्रज ते सांगलीवाडी टोलनाक्यापर्यंतचे काम अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामावरून गेली पाच वर्षे नागरिक, सामाजिक संघटनांचा संघर्ष सुरू आहे. सांगली ते पेठ या रस्त्यासाठी २०१७ मध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनाने दिल्लीलाही हादरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव या रस्त्याला देण्याची अभिनव आंदोलनाची कल्पना राबविली गेल्यामुळे त्याचा डंका गुजरातपर्यंत वाजला. त्यामुळे राज्य महामार्गातून सुटका करीत या रस्त्याचा समावेश राष्टÑीय महामार्गात करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनल्यानंतरही रस्त्याचे दुखणे थांबलेले नाही. प्रवाशांना, येथील शेतकऱ्यांना, नागरिकांना गेली अनेक वर्षे हा रस्ता छळत आहे.
तीन वर्षापूर्वी पेठ ते सांगली या मार्गाच्या डांबरीकरणासाठी तीन टप्पे करण्यात आले. बावची फाटा ते वाळवा फाटा, औदुंबर फाटा ते मिरजवाडी आणि तुंग ते सांगलीवाडी टोल नाका अशा टप्प्यात हे काम मंजूर झाले होते. संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण केल्यानंतर तुंग ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतच्या कामात पुन्हा दोन भाग पाडण्यात आले. तुंग ते कसबे डिग्रज आणि कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाका अशा दोन टप्प्यांचे शेपूट दीर्घकाळ रखडले. यातील तुंग ते कसबे डिग्रज हे काम पूर्ण झाले असले तरी, कसबे डिग्रज ते सांगलीवाडी नाक्यापर्यंतचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
गेले पाच महिने पडणाºया पावसामुळे केवळ पॅचवर्क करण्याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणताही पर्याय उरला नव्हता, मात्र पावसाने पॅचवर्क वाहून गेल्याने प्रवाशांचे भल्यामोठ्या खड्ड्यांमधून मुठीत जीव घेऊन मार्गक्रमण करणे चालू झाले आहे. वेदनांचा हा प्रवास पाऊस थांबेपर्यंत चालू राहणार आहे. नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Hell again on Sangli-Peth road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.