आदित्य ठाकरे यांच्याकडून संजना बागडी हिला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:31+5:302021-06-09T04:32:31+5:30
युवा कुस्तीगीर संजना बागडी हिला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठवलेली मदत तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते देण्यात आली. ...
युवा कुस्तीगीर संजना बागडी हिला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठवलेली मदत तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, संजय विभुते, आनंदराव पवार आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : युवा महिला कुस्तीगीर संजना बागडी हिला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ हजार रुपयांची मदत दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सोमवारी सांगलीत संजनाकडे ती सुपूर्द करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, शंभोराज काटकर, अमोल पाटील, डॉ. किशोर ठाणेकर, मयूर घोडके, बजरंग पाटील, सचिन कांबळे, दिगंबर जाधव, सुजाता इंगळे, सुनीता मोरे, विशालसिंग रजपूत आदी उपस्थित होते. संजना बागडी हिची लॉकडाऊनकाळात आर्थिक कोंडी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. कुस्तीचे मैदान सोडून तिला ३०० रुपयांच्या रोजंदारीवर उसाच्या शेतात राबावे लागत असल्याकडे लक्ष वेधले होते, त्याची दखल ठाकरे यांनी घेतली. तातडीने मदतीचा निर्णय घेतला. शिवसेनेतर्फे २५ हजार रुपयांची मदत पाठविली. शिवसेना नेहमीच कर्तृत्वशाली तरुणांच्या पाठीशी असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. या मदतीमुळे कुस्तीचा उत्साह वाढल्याची प्रतिक्रिया संजना व तिचे वडील खंडू यांनी व्यक्त केली.