सांगलीच्या ‘सुखायू’ची दिव्यांग रूपालीस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:46+5:302020-12-06T04:28:46+5:30
दुर्धर आजारामुळे दिव्यांग रूपालीचे आधारकार्ड निघत नव्हते. त्यामुळे ती शासकीय योजनांपासून २७ वर्षे वंचित होती. याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची ...
दुर्धर आजारामुळे दिव्यांग रूपालीचे आधारकार्ड निघत नव्हते. त्यामुळे ती शासकीय योजनांपासून २७ वर्षे वंचित होती. याबाबत ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताची दखल घेऊन सांगली येथील सुखायू जन्मजात व्याधी प्रतिबंध व सहाय प्रतिष्ठानने तिची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधे, कपडे, व्हिलचेअर आदी साहित्य दिले. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दीक्षित, उपाध्यक्षा डॉ. नंदिनी पाटील, महादेव देसाई यांच्या उपस्थितीत रूपालीची सर्व आरोग्य तपासणी डॉ. रवीन्द्र व्होरा, डॉ. महेश साळे व डॉ. अनिकेत लिमये यांनी केली. आदित्य पाटील यांनी तिला आवश्यक औषधे, कपडे, किराणा माल दिला.
डॉ. नंदिनी पाटील म्हणाल्या, आमची संस्था ही जन्मजात व्याधीग्रस्त व्यक्तीच्या सर्वंकष विकास व त्यांना आवश्यक उपचार, साधने, समुपदेशन व इतर सुविधा यासाठी कार्यरत आहे. जन्मजात व्याधींच्या प्रतिबंधासाठीही ही संस्था प्रयन्तशील आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स व इतर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, संस्थेचे सन्माननीय सभासद व मार्गदर्शक आहेत. रूपालीची हेळसांड हाेणार नाही. याबाबत काळजी घेऊ.
फाेटाे : ०५ शिराळा १