शिरसगाव येथे कोरोना नियंत्रणासाठी मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:36+5:302021-04-28T04:29:36+5:30
शिरसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मांडके यांचे वतीने ५० वाफारा मशीन व मास्क असे साहित्य गरजूंना ...
Next
शिरसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मांडके यांचे वतीने ५० वाफारा मशीन व मास्क असे साहित्य गरजूंना वाटप करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई कुंभार व प्रा. अशोक कुंभार यांनी १० हजार रुपये मदत दिली. तसेच मुंबई येथे कार्यरत हवालदार सर्जेराव पोतदार यांनीही पाच हजार रुपये मदत दिली. या मदतीतून आशा स्वयंसेविकांना सुरक्षा साधने तसेच अन्य वैद्यकीय साहित्य व कोरोना नियंत्रणसाठी अत्यावश्यक कामे केली जाणार आहेत.
फोटो : २७ क`ेगाव २
ओळ : शिरसगाव (ता. कडेगाव) येथे गरजू कुटुंबांना वाफारा मशीन व मास्क वाटप करण्यात आले.