शेटफळे मिनी कोविड केअर सेंटरकडे मदतीचा ओघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:16+5:302021-05-20T04:28:16+5:30
करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मिनी कोविड केअर सेंटरला मदतीचा ...
करगणी
: आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या मिनी कोविड केअर सेंटरला मदतीचा ओघ सुरू असून, औषधे, गोळ्या, फळे, अंडी यासह अन्य उपकरणांची मदत होत आहे.
आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळा व आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूलमध्ये मिनी कोविड केअर सेंटर सुरू करून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली. ग्रामपंचायत सदस्य विजय देवकर यांनी तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप केले. तालुका युवा सेनाप्रमुख संतोष पुजारी यांनी अंडी, फळे व औषधे भेट दिली. शेटफळेतील गुलाब काटकर, दत्तात्रय कांबळे, अनिल गायकवाड, आनंदराव गायकवाड यांनी औषधे भेट दिली.
आटपाडीचे अभियंता महेश पाटील यांनी औषधे, सॅनिटाइझर यासह अन्य साहित्य दिले आहे.
लोकसहभाग वाढत आहे.
फोटो : शेटफळेत मिनी कोविड केअर सेंटरला औषधे भेट देताना महेश पाटील, विजय देवकर, आरोग्यसेवक नाना चवरे.