नगरसेवक थोरातांकडून दोन विद्यार्थिनींना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:30+5:302021-01-22T04:24:30+5:30
थोरात यांच्या प्रभाग २ क्रमांकमधील दोन विद्यार्थिनींनी झोपडीत अभ्यास करून ८५ टक्के गुण मिळविले. या दोघींनाही सगरसेवक थोरात ...
थोरात यांच्या प्रभाग २ क्रमांकमधील दोन विद्यार्थिनींनी झोपडीत अभ्यास करून ८५ टक्के गुण मिळविले. या दोघींनाही सगरसेवक थोरात यांनी लठ्ठे पॉलिटेक्निक संस्थेत नुकताच प्रवेश मिळवून दिला. त्यासाठी सर्व फी थोरात यांनी भरली. दहावीच्या परीक्षेवेळी नगरसेवक थोरात यांनी ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन ख्वाॅजा झोपडपट्टीत घरोघरी जाऊन दिले होते.
झोपडपट्टीतील हुशार विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये या एकमेव उद्देशाने त्यांनी हे आवाहन केले होते. त्यांच्या या अहवानाला परिसरातील दोन विद्यार्थिनींनी प्रतिसाद दिला. त्यांना ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने नगरसेवक थोरात यांच्याशी संपर्क साधला. थोरात यांनी या दोघींनाही लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये नेऊन त्यांची सगळी फी आणि अन्य पैसे स्वत: भरले आणि या दोघींना सिव्हिल आणि मेकॅनिकल शाखेस प्रवेश मिळवून दिले.
फोटो-२१सीटी०१
फोटो ओळ : मिरजेतील ख्वॉजा झोपडपट्टीतील दोन गुणवंत विद्यार्थिनींना नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रवेशावेळी मदत केली.