आर्केस्ट्रा कलाकारांना जीवनावश्यक किटची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:17+5:302021-07-09T04:17:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. कोरोनाचा कहर व शासनाने घातलेल्या बंदीमुळे कलाकारांवरही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. कोरोनाचा कहर व शासनाने घातलेल्या बंदीमुळे कलाकारांवरही संक्रांत आली आहे. कलाकार भुकेने व्याकूळ झाले असून, चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकारामबाबा महाराज यांनी आर्केस्ट्रा कलाकारांच्या घरी जाऊन मदत केली.
तुकारामबाबा महाराज यांनी मिरज व कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथील कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. स्वतः कलाकारांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
कलाकार आप्पासो नदाफ, प्रशांत माने, सुहास चिंडे, हयातचांद नदाफ, ज्योती कोरे, नीलेश कांबळे, सुप्रिया दबडे, रजाक नदाफ, तनुजा नदाफ, आयुब जमादार, कल्पना माने, तुकाराम कोळी, साजादबी बारगीर, सुरेखा पवार, रामा कोळी, वर्षाराणी धुमाळ, हिम्मत कांबळे, शानुर जमादार, गणेश कांबळे, समीर सय्यद यांना जीवनावश्यक किटचे वाटप केले.