हाय बेबी, विल यू बीकम माय बेस्ट फ्रेण्ड? चौथीच्या मुलाचा वर्गमैत्रिणीला मेसेज

By संतोष भिसे | Published: July 16, 2023 07:42 AM2023-07-16T07:42:35+5:302023-07-16T07:43:12+5:30

चौथीच्या मुलाचा वर्गमैत्रिणीला मेसेज, शाळेत तातडीची पालक सभा

Hi baby, will you become my best friend? crime in sangli school | हाय बेबी, विल यू बीकम माय बेस्ट फ्रेण्ड? चौथीच्या मुलाचा वर्गमैत्रिणीला मेसेज

हाय बेबी, विल यू बीकम माय बेस्ट फ्रेण्ड? चौथीच्या मुलाचा वर्गमैत्रिणीला मेसेज

googlenewsNext

संतोष भिसे

सांगली : मोबाइलवर मेसेज आला, ‘हाय बेबी, वील यू बीकम माय बेस्ट फ्रेण्ड?’ अनोळखी नंबरवरून आलेल्या गोडगुलाबी मेसेजने पप्पांना कदाचित गुदगुल्याही झाल्या असतील; पण वास्तव समोर आले तेव्हा त्यांची मती गुंग होण्याची वेळ आली. मोबाइलचे वेड आणि सोशल मीडियाचा वापर-गैरवापर कोणत्या स्तरापर्यंत खालावला असावा याचे उदाहरण देणारी ही घटना घडली मिरज शहरात.

शहरातील उच्चभ्रू सेमी इंग्लिश शाळेत मुख्याध्यापकांसमोर हा पप्पा मोबाइल घेऊन उभा राहिला, तेव्हा मुख्याध्यापकांनाही शालेय शिस्तीच्या फेरआढाव्याची गरज भासली. चौथीच्या विद्यार्थ्याने वर्गातील मैत्रिणीच्या वडिलांच्या मोबाइलवर हा मेसेज पाठवला. वर्गात दंगामस्ती करताना तिच्या पप्पांचा मोबाइल क्रमांक घेतला. घरी गेल्यावर वडिलांच्या मोबाइलवरून त्यावर हा मेसेज पाठवला. त्याच्या बालसुलभता चेष्टेने पालकांची चिंता वाढली आहे. शाळेने गुरुवारी तातडीने पालक सभा बोलावली. सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांतील पालकांना सक्तीने बोलावले. मोबाइलच्या वापराविषयी सज्जड सूचना दिल्या.

शाळेने संगितले...
nमुलांच्या अभ्यासासाठी मोबाइलचा वापर बंद करा
nशाळेत मुलांना मोबाइल अजिबात देऊ नका
nपाल्याला शाळेत मोबाइल देणाऱ्या पालकांना दंड ठोठावणार
nरात्री आठनंतर घरात मुलांना मोबाइलबंदी करा

वडील म्हणतात, मोबाइलवर कविता पाठ होतात
nपालक सभेत एका पालकाने मोबाइल वापराचे समर्थन केले. मोबाइलवर कविता चांगल्या पाठ होतात, गणित चांगले समजते. विज्ञानाच्या संकल्पना पुरेशा स्पष्ट होतात. 
nत्यामुळे मोबाइलवर निर्बंध नकोत अशी भूमिका घेतली; पण शाळेने ती खोडून काढली. शैक्षणिक फायद्यापेक्षा त्याचे 
तोटे जास्त धोकादायक असल्याचे शाळेने स्पष्ट केले. 

Web Title: Hi baby, will you become my best friend? crime in sangli school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.