मिरजेमध्ये महामार्गाची चाळण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:16 PM2018-11-11T23:16:47+5:302018-11-11T23:16:51+5:30
मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. ...
मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या महापालिका हद्दीतील या रस्त्यासाठी शंभर कोटी मिळणार असल्याचे गाजर दाखविण्यात येत असले तरी, शहरातील प्रमुख मार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेच्या विकास कामांचे पितळ उघडे पडले आहे.
मिरजेतील बसस्थानक ते गांधी चौकातून पंढरपूरकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरून कर्नाटक, कोल्हापूर व पंढरपूरकडे जाणारी दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मोठ्याप्रमाणात वाहतूक असल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. बसस्थानक ते शिवाजी क्रीडांगणापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने बाहेरून येणारे वाहनधारक महापालिकेच्या कारभाराबाबत लाखोली वाहत आहेत. कर्नाटक हद्दीत चांगले रस्ते असल्याने महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर दोन्ही राज्यातील रस्त्यांची तुलना होते. रत्नागिरी-नागपूर या राज्य महामार्गास राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर मिरजेतून बसस्थानक ते गांधी चौक हा रस्ता राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.
रस्त्याचा दर्जा बदलल्यानंतर गेल्या दहा महिन्यांत रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाची दुरूस्ती व रूंदीकरणासाठी महापालिकेने ३३ कोटी खर्चाचा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आराखडा तयार केला होता. मात्र या रस्त्याखालून जलवाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या असल्याने काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आता तानंगपासून मिरजेतील उत्तमनगरपर्यंत दहा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभिकरणाचा शंभर कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजूर केल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा आहे. मात्र शंभर कोटी खर्चाचे रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने खराब झालेल्या या प्रमुख रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. राष्टÑीय महामार्ग असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी आमची नसल्याचे महापालिका प्रशासनाने हात झटकले आहेत, तर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याने काम थांबविले आहे. खराब रस्त्यांबाबत वारंवार होणाºया तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
वारंवार आंदोलने : तरीही आश्वासनांचीच बरसात
बसस्थानकाजवळ संपूर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्याशेजारी सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने वाहतुकीची कोंडी होते. खोक्यांमुळे अरूंद रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते दुरूस्ती व अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रलंबित आहे. मिरजेत बसस्थानक-गांधी चौकापर्यंत राष्टÑीय महामार्ग आहे. मात्र बसस्थानकापासून शास्त्री चौकापर्यंत महापालिकेचा रस्ताही खराब झाला आहे. रस्ते दुरूस्तीसाठी वारंवार आंदोलने सुरू आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांकडे रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र रस्ता दुरूस्तीबाबत केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत.