महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:02 PM2020-07-01T13:02:37+5:302020-07-01T13:03:39+5:30

मिरज-कोल्हापूर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या मोठ्या झाडांचे आपल्या शेतात स्वखर्चाने पुनर्रोपण करुन मिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी १५ झाडांना जीवदान दिले आहे. रस्त्यालगतच्या कापण्यात येणाऱ्यां आणखी काही झाडांचे पुनर्रोपण करण्याची डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांची तयारी आहे. हळिंगळे यांच्या या कार्याचे वृक्षप्रेमींकडून कौतुक होत आहे.

Highway replanting of trees at own cost | महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण

महामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपण

Next
ठळक मुद्देमहामार्गालगतच्या झाडांचे स्वखर्चाने पुनर्रोपणमिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी दिले १५ झाडांना जीवदान

मिरज : मिरज-कोल्हापूर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कापण्यात येणाऱ्या मोठ्या झाडांचे आपल्या शेतात स्वखर्चाने पुनर्रोपण करुन मिरजेतील डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांनी १५ झाडांना जीवदान दिले आहे. रस्त्यालगतच्या कापण्यात येणाऱ्यां आणखी काही झाडांचे पुनर्रोपण करण्याची डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांची तयारी आहे. हळिंगळे यांच्या या कार्याचे वृक्षप्रेमींकडून कौतुक होत आहे.

मिरज-कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण सुरु असून यासाठी रस्त्यालगत असलेली अनेक झाडे कापण्यात येत आहेत. व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर हळिंगळे यांचे मिरजेत कोल्हापूर रस्त्यावर फार्म हाऊस आहे. त्यांनी येथे विविध प्रकारची सहाशे झाडे लावली आहेत. झाडे जगविण्यासाठी व मोठी होण्यासाठी अनेक वर्षे परिश्रम घ्यावे लागतात.

महामार्गालगतची १५ ते २५ वर्षे वयाची झाडे कापण्यात येत असल्याचे पाहून डॉ. हळिंगळे यांनी या झाडांचे पुनर्रोपण करण्याचे ठरविले. डॉ. हळिंगळे व त्यांच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या पथकाने फार्म हाऊसमध्ये नारळ, आवळा, कडीलिंब, चिकूच्या १५ ते २५ वर्षे जुन्या १५ मोठ्या झाडांचे रस्त्यालगतच्या फार्म हाऊसमध्ये पुनर्रोपण केले.

जेसीबी, क्रेन व ट्रॉलीच्या साहाय्याने झाडाच्या बुंध्याजवळ जवळजवळ आठ चौरस फुटाचा खड्डा खणून झाडे बाहेर काढण्यात आली. नवीन ठिकाणी रोपण करण्यापूर्वी झाडाची मुळे, माती जमिनीला घासू नये, यासाठी पोती व साध्या कापडाने बांधली. नवीन जागेत सुमारे दहा चौरस फुटाचा खड्डा काढून झाडे लावण्यात आली.

निर्मल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसह झाडांच्या पुनर्रोपणाची माहिती असलेले स्वरूप रायनाडे, विनायक कवडे, सागर जाधव, भैरव वालीकर, दीपक साळुंखे, आपासाहेब हुरले, कोळेकर यांच्या मदतीने पुनर्रोपण करण्यात आले. सुमारे अर्धा किलोमीटर परिसरातील झाडांचे फार्म हाऊसमध्ये पुनर्रोपण केले असून नव्या ठिकाणी या झाडांचे रोपण यशस्वी झाले आहे.

Web Title: Highway replanting of trees at own cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.