आरेवाडीत बिरोबा काशिलिंगाचा जयघोष - नैवेद्यासाठी भाविकांची रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:28 AM2019-04-12T11:28:07+5:302019-04-12T11:29:00+5:30
महाराष्ट, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाज बांधवांचे आराध्यदैवत असणाºया आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा
ढालगाव : महाराष्ट, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाज बांधवांचे आराध्यदैवत असणाºया आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा देवास गुरुवारी सार्वजनिक गोडा नैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास भाविकांनी गर्दी केली होती.
बिरोबा काशिलिंगाचा जयघोष व भंडारा उधळत भाविकांनी गुरुवारी बिरुदेवाचे दर्शन घेतले. आज (शुक्रवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे. येळावी (ता. तासगाव) येथील गावडे बंधूंचा मानाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही यात्रेत भाविकांची संख्या सुमारे दोन लाख आहे. परंपरेप्रमाणे भाविक सवारीच्या बैलगाडीतून बैलांसाठी चारा, पिण्याच्या पाण्यासाठी घागर आदी साहित्य घेऊन खासगी व भाडोत्री वाहनाने दाखल झाले आहेत. यात्रेत पाणी निर्जंतुकीकरण करून पुरविण्याचे काम आरोग्य विभागाने पार पाडले असले, तरी यात्रेच्या मुख्य दिवशीच खरा कस लागणार आहे. आतापर्यंत १५० रुग्णांवर उपचार केले असून, डॉ. सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वैद्यकीय अधिकारी यांच्यासह २७ जणांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. रुग्णवाहिकेची सोयही करण्यात आली आहे.