अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून उपेक्षितांची दु:खे मांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:15+5:302021-07-20T04:19:15+5:30
वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विजयराव लोंढे यांनी अभिवादन केले. यावेळी संजय खवळे, ...
वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विजयराव लोंढे यांनी अभिवादन केले. यावेळी संजय खवळे, बी. एस. गायकवाड, रामराव बल्लाळ, एस. बी. साठे, संजय साठे, शशिकांत जाधव, राजेंद्र कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून उपेक्षित समाजाची दु:खे मांडली, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाचे स्फुलिंग पेटवले. समाजातील शिकलेल्या मुलांनी त्यांचे चरित्र व त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करून त्याची आजच्या परिस्थितीमध्ये मांडणी करावी, असे आवाहन वाळवा तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष, गोटखिंडीचे सरपंच विजयराव लोंढे यांनी येथे केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाळवा तालुका मातंग समाज संघटनेच्यावतीने वाटेगाव या त्यांच्या जन्मगावातील पुतळ्यास लोंढे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
संजय खवळे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही; मात्र त्यांनी लिहिलेले साहित्य समाजाला प्रेरणादायी आहे. समाजातील शिकलेल्या युवकांनी त्यांचे व्यक्तिमतत्त्व, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास करून ते समाजाच्या तळागाळापर्यंत न्यावे. त्यातून निश्चित वैचारिक क्रांती घडू शकेल.
संघटनेचे उपाध्यक्ष बी. एस. गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रामराव बल्लाळ, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक एस. बी. साठे, संजय साठे, नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत साठे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.