सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:20 AM2021-03-22T11:20:25+5:302021-03-22T11:25:41+5:30

Muncipal Corporation Water Sangli- सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

The history board of the black mine in Sangli shone | सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

Next
ठळक मुद्देसांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकलामहापालिकेचा खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार

सुरेंद्र दुपटे

संजयनगर/सांगली ः सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

आयुक्त नितीन कापडणीस यांनी या खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकावर असा मजकूर लिहिला आहे, काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर संस्थानिक राजधानी करण्याचे निश्चित करून ते सुनियोजित पद्धतीने वसवण्याचे ठरवले.

राजधानीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय इमारती, नागरिकासाठी घरे, गणेश दुर्ग, किल्ला नदीकाठावरील गणेश मंदिर ,यासाठी मोठ्या प्रमाणात दगडाचे आवश्यकता होती आणि हा दगडाचा पुरवठा सांगली गावाजवळच मिळेल का ? याचा शोध चिंतामणराव यांनी घेतला.

या वेळी सांगलीच्या पूर्व बाजूला असलेल्या सध्या काळी खण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील जमिनीच्या भूगर्भातील कठीण असा काळा दगड त्यांना आढळून आला. त्यामुळे नवीन राजधानीसाठी लागणाऱ्या बांधकामासाठी दगडाची गरज गावाजवळच पूर्ण झाल्याने त्यांनी याठिकाणी खण तयार केली. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड बाहेर काढण्यात आले. त्या दगडातून सांगली शहराच्या तत्कालीन अनेक इमारती घरे, उभी राहिली.

मोठ्या संख्येने खाणकाम केल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. त्यात पाणी साठल्याने याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे राजधानीसाठी लागणाऱ्या सर्व इमारतीची गरज पूर्ण झाल्यावर ही खण तशीच पडून राहिली. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले, तसेच भुगर्भातूनही पाण्याचे झरे मिळत गेले. त्यामुळे या जागेला तळ्याचे स्वरूप आले. काळ्या दगडाची खण म्हणून ती काळी खण या नावाने ओळखली जाऊ लागली. आता सुशोभीकरणात याबाबतचा इतिहास सांगणारा फलक महानगरपालिकेने काळा खणीत लावला आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

गणेश मंदिर, गणेश दुर्गच्या तटबंदीसाठी याच खणीतून आणला दगड 

विशेष म्हणजे गणेश दुर्ग या मोठ्या भुईकोट किल्ल्याच्या दगडी तटबंदीसाठी त्यांनी याच काळया खणीच्या दगडाचा वापर केला. सांगलीतील गणेश मंदिरासाठी काही दगड जोतिबा डोंगरावरून मागवण्यात आले होते मात्र अन्य कामासाठी लागणारा दगड याच खणीतून आणला होता.

पद्मभूषण शहा यांनी काढलेले चित्र फलकावर

पद्मभूषण डॉक्टर विजयकुमार शहा यांनी १९५८ मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना काळया खणीचे काढलेले चित्र या फलकावर लावले गेले आहे.

 

Web Title: The history board of the black mine in Sangli shone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.